top of page

ऑनलाईन कोर्स शिका, जीवनात यशस्वी होऊन टीका

नमस्कार मित्रांनो, आजचं युग हे डिजिटल होत चाललंय, त्यामुळे आपल्यालाही डिजिटल व्हावंच लागेल, नाहीतर आपली लाईफ हळू हळू ऑफलाइन होऊ शकेल, माझा सांगण्याचा उद्देश म्हणजे आपली ओळख ऑनलाइन व्हायला पाहिजे, त्याचे दोन फायदे होतील

१. घरात बसून, कोरोना पासून वाचून आपण आपल्या नातेवाईक, मित्र मंडळी यांच्या संपर्कात राहू आणि

२. ऑनलाइन चा वापर करून आपण स्वतःचा बिझनेस काय आहे हे लोकांना सांगून काम मिळवू शकतो.

हे सर्व आपल्याला यायलाच पाहिजे, नाहीतर पुढे ह्या जगात टिकणं मुश्किल होईल, तुम्हाला मी घाबरवत नाहीये पण आता जे घडतंय त्याचा खोल विचार करा, मी सुद्धा विचार करून आता घरामधून डिझाईन, एडिटिंग, ऍनिमेशन सोबत ऑनलाइन क्लास अशी कामं सुरु केली आहेत. आता तुम्ही विचार करणार कि आम्हाला कुठं कॉम्प्युटर येतंय, असू द्या मलाही अगोदर कॉम्प्युटर च्या नावाने भीती वाटायची पण, वेळ हि खूप महत्वाची असते तिचा उपयोग चांगल्या करता वापरायला घेतला कि त्या वेळेत आपल्याला जरी काहीच समजले नाही, तरीसुद्धा त्या वेळेत आपण जे घेतलं त्याचं नुकसान कधीच होत नाही, नक्कीच पुढे ते आपल्याला यायला लागतं, कारण ते आपल्या नजरेसमोरून गेलेलं असतं, आपण प्रयेत्न केलेले असतात. फरक एवढाच कि नंतर ते प्रेयत्न आपण सोडून देतो, पण जर सारखं बघून बघून करत राहिलो तर नक्कीच पुढे कोणाचाही आधार न घेता आपण सहज ते काम यशस्वी करतो, फक्त सुरुवात करायला पाहिजे.

आपण आजपासून ऑनलाईन जगू या असा उद्देश घेऊन मी अगदी सुरुवाती पासून मला जे जे माहितीये ते तुम्हाला खूप स्वस्त पैशांमध्ये शिकवून देण्यासाठी निर्णय घेतलाय, ह्या जगात बघून खूप काही शिकता येतं याचा स्वतः अनुभव मी घेतलाय, त्यामुळे एक एक व्हिडिओ आम्ही स्टेप बाय स्टेप स्क्रीन बनवून तयार केलीये, जी तुम्ही बघूनही शिकू शकता कारण ते व्हिडिओ लाईफटाइम तुमच्याजवळ राहतील असा विचार करून हा कोर्स तयार केलाय.

चला तर मित्रांनो, आजपर्यंत आपल्या मेहनतीच्या पैशाने रिचार्ज मारून फक्त दुसऱ्याला हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सोबत काही वेस्टेड विडिओ, मॅसेज पाठवून वेळ वाया घालवला, पण आता ह्या क्षणापासून जर पुन्हा पैसे खर्च करून, शिकण्याचा निर्धार करत, माझं स्वतःच विश्व् निर्माण करू शकेल तर आमचे कोर्स घ्या आणि नव्याने डिजिटल दुनियेत उभं राहण्याचा विचार करा.

"ऑनलाईन जगू एक एक कोर्स शिकून बघू" अशी छोटीशी घोषणा देत
तुम्हाला कोणता कोर्स घायचे त्या बटनावर क्लिक करून कोर्स विकत घ्या.

ONLINE LEARN COURSES

सध्या सगळे बटन्स बंद आहे
पण जर कोर्सची माहिती बघायची असेल तर बटनावर क्लिक करून बघू शकता

कोर्सचे विडिओ अजून रेडी नाहीये, काम चालू आहे, जसा कोर्स पूर्ण झाला कि तुम्हाला या बद्दल फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब या प्लॅटफॉर्म वर जाहिरात अपलोड केली जाईल.

Learn Softwares

वन टाइम पेमेंट, लाइफ टाइम ऍक्सेस

Thank you for visiting our website

©2020 by NirmanRekha Film. Proudly created with Wix.com

bottom of page