निर्माणरेखा फिल्म बद्दल
थोडक्यात सांगतो, वर्ष २००४ ला बारावी शिक्षण पूर्ण करून फिल्म लाइनमध्ये जायचे ठरवले, उशीरा का होईना पण फिल्म दिग्दर्शन आणि स्क्रिप्ट रायटिंग यांचं शिक्षण सेन्स इंडिया फाऊंडेशन, मुंबई विद्यापीठ, कलिना युनिव्हर्सिटी मध्ये पूर्ण केल. फिल्म बद्दल माहिती मिळत गेली तसा विचारांचा डोंगर बनायला सुरुवात झाली आणि इथूनच फिल्म कशी बनवायची याचं उत्तर घेत फिल्मी दुनियेत आपलं स्थान निर्माण करायचं त्यासाठी "निर्माणरेखा फिल्म" ची निर्मिती केली.
कथेचा विषय साधा व सरळ असावा पण काहीतरी वेगळं निर्माण करावं जगासमोर अशीच विचारांनी जिद्द धरली, डोक्यात विचारांच्या लाटा उसळायला लागल्या, जशी पाण्याची एक लाट आपल्या अंगावर येताच आनंद मिळतो मग तीच लाट आपल्याला आतमध्ये खेचतेय अशी जाणीव होताच आपण स्वतःला सावरतोच ना, त्याचप्रमाणे एक शब्द सुचला, जो आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे, कधी कधी तो शब्द आपल्याला टोचून गेलाही पण, तोच शब्द आपल्या फिल्मसाठी योग्य आणि आयुष्यभर नेहमी घ्यायचाच असा ठाम निश्चय करून विश्वास निर्माण केला आणि तो शब्द म्हणजे "वेडा".
निर्माणरेखा फिल्म मध्ये तुमच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारे, डोक्यात चांगले विचार येणारे, जीवनामध्ये फक्त चांगलंच करायचं अशा अनेक प्रकारे फिल्ममध्ये सीन, संवाद, स्क्रीनप्लेय, इमोशन वगैरे आम्ही दाखवणार. अजून एकही फिल्म आम्ही बनवली नाहीये कारण, त्यासाठी लागणारे पैसे, मटेरिअल्स, इत्यादी, तसं प्रेयत्न चालू आहे पण, भविष्यात नक्कीच अशा फिल्म्स आम्ही बनवणार आहेत. त्यासाठी एक फक्त आयडिया म्हणून शब्दांचा संग्रह घेऊन तुम्हाला ह्या टेक्स खाली रफ इमेज आणि डायलॉगची शब्दरचना दाखवली आहे. ही बघा.
about nirmanrekha film
In a nutshell, I decided to join the film line in 2004 after completing my 12th year of education. As the information about the film spread, a mountain of ideas began to form and from here, he created "Nirmanrekha Film" in order to make his place in the film world by answering the question of how to make a film.
The subject matter of the story should be simple and straightforward but something different should be created. Waves of thoughts began to rise in our heads, just like a wave of water brings happiness to our body, then when we realize that the same wave is pulling us inside, do we recover ourselves? In the same way, a word came to us, which is familiar to all of us, sometimes that word pierced us, but, He created the belief that the same word was appropriate for his film and that he would always take it for the rest of his life, and that word means "crazy".
We will show scenes, dialogues, screenplays, emotions, etc. in many ways in the film, such as building confidence in your mind, good thoughts in your head, just wanting to do good in life. We haven't made a single film yet, because the money, materials, etc., are still being sought, but we will definitely make such films in the future. The only idea for this is to take a collection of words and show you the wording of the rough image and dialogue under this text. Look at this.
आई अरे बाळा, खुप चांगले विचार तुला सुचले आणि जिथे चांगल्या विचारांचा जन्म होतो, त्या अगोदर तिथे विजय निर्माण झालेला असतो, चांगल्या कार्याला कधी घाबरायचं नाही, चालत रहायचं मार्ग सापडतोच, ये इकडे, शिवाजी महाराजांची किर्ती कधीच विसरू नको, त्यांनी समर्थांची आकाशवाणी कायम अंतरी तेवत ठेवली, केल्याने होत आहे रे आधि केलेची पाहीजे, ते जगात येतांना विजय घेऊन आले म्हणण्यापेक्षा विजयच त्यांच्यासोबत आला, सोबत राहिला, मात्र जातांना त्यांनी काय केलं माहितीये.
दिनेश काय
आई जातांना त्यांनी अंतरी विजयला प्रणाम केला आणि म्हणाले की, मी आता चाललोय पण यापुढे जो मानव उत्तम विचार ठेवुन, उत्तम कार्य करेल कोणाचेही नुकसान न करता, त्याच्यासोबत तु अखंड रहा. बाळा, नीट ऐक, तु जेव्हा चांगल्या विचारांनी सुरूवात करशील, तेव्हा तुझ्यासमोर असलेली संकटांची पर्वत पण तुला त्यांच्यातुनच राजमार्ग तयार करून देतील.
दिनेश आई, तुझ्या बोलण्याने तर अजुन ऊत्साह माझ्या अंतरी निर्माण झाला, मी आता नक्कीच चांगलं कार्य करणार.
आई यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, गुणवंत, विजयीभव.