top of page

नमस्कार सर्वांना,
माझं नाव दिनेश रामदास ढवळे

राहणार कल्याण, गाव (गंभीरवाडी) धामणगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक.

जन्म १४ नोव्हेंबर १९८२, घरात नाव राजू, वाडीत नाव गोट्या आणि शाळेत नाव दिनेश अशा प्रवासाला सुरुवात झाली ह्या जगामध्ये आणि इथे जगण्यासाठी अनेक अनुभव घेतले त्यामध्ये शिशुविहार मित्राटाईप, कल्याण पूर्व येथे दहावी सहा वेळा नापास होऊन पास, नंतर कॉलेज शिक्षण, न्यू हायस्कुल जुनिअर कॉलेज, जोशीबाग, कल्याण पश्चिम येथे १२ वी पास करून पैशाअभावी थांबवलं, मग काय बस, ट्रेन, पायपीट करत कामाचा अनुभव घ्यायला जीवनप्रवास करत राहिलो तेव्हा एका क्षणाला विचार आला कि या जगात पण आपलं ४थ नाव निर्माण करायचं, पण नाव काय ठेवायचं असा विचार करत, प्रयत्न करत खऱ्या जीवनाला सुरुवात केली आणि "निर्माणरेखा फिल्म" ची निर्मिती झाली.

सध्या कोरोना च्या काळामध्ये बाहेर परिस्थिती वाईट आहे, पण तरीपण काही जण जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबासाठी कामाला जातायेत, असो त्या सर्वानी काळजी घ्या.

पण मी असा विचार केला कि बाहेर जाण्यापेक्षा घरात राहूनच व्यवसाय सुरु करावा, त्यासाठी प्रथम नाव निर्माण केलं ते म्हणजे "निर्माणरेखा फिल्म" असे.

निर्माणरेखा फिल्म हे काय आहे तर ते आहे एक कंपनी, म्हणजे जसं जगात अनेक कंपन्या आहेत, त्याचप्रमाणे आपली स्वतःही एक कंपनी असावी असा मनात विचार आला आणि निर्माणरेखा फिल्म ला सुरुवात झाली, याद्वारे अनेक प्रकारचे कामं तुम्हाला पुढे दिसत राहणार.

कामं दोन प्रकारची असतात १. समोरच्याला त्याच्या माहिती प्रमाणे  काम करून देऊन पैसे मिळवायचे आणि २. आपण स्वतः काही उपयोगी असं बनवुन विकण्यासाठी तयार करून त्यापासून पैसे मिळवायचे.

आणि या सगळ्यासाठी पुन्हा दोन काम तयार करायचे १. प्रथम स्वतःचा पोर्टफोलिओ आणि
२. स्वतःच ऑनलाइन दुकान बनवायचं

आणि निर्माणरेखा फिल्म चा माझा प्रवास सुरु केला मित्रांनो

एनआर फिल्म सध्या मी एकटाच चालवत आहे, त्यासाठी लागणारी डिझाइन, एडिटिंग, ऍनिमेशन, लिखाणकाम हे सर्व स्वतः एकटाच करतोय, एनआर फिल्मसाठी लागणारी लोगो, टायटल, बॅनर, चॅनेल्स, वेबसाइट हे सर्व मी स्वतः केलेत आणि आता तुम्हाला हि डिझाइन बनून देण्यासाठी सुरुवात केलीये, हळू हळू माझ्याकडे नक्कीच टीम मेंबर्स येतील,

तोपर्यंत वन मॅन शो.

bottom of page